महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अखेरीस झाला जाहीर - byelection program has finally announced in mumbai

By

Published : Oct 5, 2022, 4:43 PM IST

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम Andheri East Assembly ByElection अखेरीस जाहीर झाला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि मुंबई महानगरपालिका Mumbai Municipal Corporation निवडणूकीपूर्वी ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ठाकरे गट भाजपा आणि शिंदे गट यांनी आता कंबर कसली आहे. शिवसेना पक्षाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अंधेरीत वाहतुकीची समस्या आहे आणि अंधेरी मध्ये पालिकेचे हॉस्पिटल नाही आहे ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. पक्षाने जो आदेश दिला तो मी मान्य करणारा कार्यकर्ता आहे. ही जागा आम्ही युतीमध्ये लढणार आहोत एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची मूळ शिवसेना आणि भाजप यांच्यात युती आहे आणि त्या युतीचा उमेदवार म्हणून मी भाजपकडून ही निवडणूक लढणार आहे. निवडणूक चिन्ह हे शिंदे गटालाच मिळेल हा माझा विश्वास आहे. मूळ शिवसेना आमच्या सोबत आहे त्यामुळे ही निवडणूक आम्ही 40000 जास्त मताने जिंकू यात शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details