Clean Chit Given to Aryan Khan : एनसीबीची कार्यपद्धती चुकीची, अधिकाऱ्यांना करावी शिक्षा : शिवसेना प्रवक्ते आंनद दुबेंची प्रतिक्रिया - एनसीबीचा गैरकारभार
शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे यांनी आर्यन खानवर मार्मिक प्रतिक्रिया देऊन केंद्राला सल्ला दिला आहे. सरकार तपास यंत्रणा कशी वापरते, हे आज उघड झाले. एक तरुण 28 दिवस तुरुंगात होता, त्याचे नाव आरोपपत्रात नव्हते. आता एनसीबीची हीच का कार्यपद्धती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कालच आर्यन खानला क्लिन चीट मिळाल्यामुळे तपास यंत्रणांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.