Ajit Pawar : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रश्नावर पवार-पंतप्रधान भेट असू शकते -अजित पवार - pawar-PM meeting
अहमदनगर (शिर्डी) - पाठीमागच्या काळामध्ये आम्ही पवारसाहेबांना सांगितले होते. की, निवडून आलेल्या मंत्रिमंडळाने निवडून दिलेल्या बारा विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं राज्यपालांकडे दिले आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी त्याव स्वाक्षरी केलेली नाही. त्याबाबत आपण लक्ष घालावे. कदाचित आज बुधवार(दि. 6 एप्रिल)रोजी झालेली पवार साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यासंदर्भात असण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते शिर्डी दौऱ्यावर होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST