VIDEO : पुण्यात सुनेत्रा पवारांनी साकारली महादेवाची चक्क्याची पिंड
पुणे - बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चक्क्याची महादेवाची पिंड साकारली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सकाळी त्यांनी दर्शन घेतले. सुनेत्रा पवार यांनी चक्क्याचा उपयोग करून दहा मिनिटात चक्रेश्वर महादेव साकारले. तसेच आरोग्यसंपन्न महाराष्ट्राकरीता दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना देखील केली. सुमारे 51 किलो चक्का वापरून ही पिंड साकारण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST