महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

झिरो बजेट 'सेंद्रिय शेती' - 3mp package

By

Published : Jul 24, 2021, 7:06 AM IST

आज प्रत्येकजण झपाट्याने विविध आजारांच्या कचाट्यात सापडत आहे. फळ आणि भाजीपाल्यांवर वापरले जाणारी कीटकनाशके हे त्यामागील प्रमुख कारण आहे. शेतकरी पिकांवर रोग आल्यानंतर आणि अळ्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी कीटकनाशकांचा वापर करतात. करनाल जिल्ह्यातील नसीरपूर गावातील शेतकरी जगतराम हे देखील अशाच काही आजाराने व्यथित होते. यामुळे त्यांनी निश्चय केला आणि विषमुक्त शेतीला सुरूवात केली. तब्बल 13 वर्षापूर्वी त्यांनी झिरो बजेट शेतीला सुरूवात केली. आज ते इतरांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. ते शेतकऱ्यांना झिरो बजेट शेतीसह सेंद्रिय शेतीबद्दलही मार्गदर्शन करतात. कारण शेतकऱ्यांनी किमान आपल्या दैनंदिन आहारात तरी शुद्ध सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या विषमुक्त पालेभाज्यांचा वापर करावा.

ABOUT THE AUTHOR

...view details