कोरोनाच्या काळात काय काळजी घ्यावी, जाणून घ्या डॉ. महेश गायकवाड यांच्याकडून
बारामती - महाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसह ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. कोणताही संसर्गजन्य आजार ठराविक काळासाठी सर्वत्र पसरत असतो. तसेच कोरोना हा सुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रादुर्भाव तीन वर्षांपर्यंत राहू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. कोरोना काळात नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत पर्यावरण तज्ञ डॉ. महेश गायकवाड यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली.