गोकुळ निवडणूक : मतदानाला सुरुवात; अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क - गोकुळ दूध संघ निवडणूक बातमी
कोल्हापूर - जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्थात गोकुळच्या निवडणुकीचे मतदान सुरू झाले आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराची तपासणी करूनच मतदानासाठी सोडले जात आहे. जिल्ह्यातील 70 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या संपूर्ण तयारीबाबतचा मतदान केंद्राबाहेरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...