गडचिरोलीत 170 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 170 ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडेसात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा बघायला मिळत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.