मुंबई : कोरोनाविषयी जनजागृतीसाठी विक्रोळी पोलिसांचे पथसंचलन - विक्रोळी पोलीस पथसंचलन बातमी
मुंबई - कोरोनाचा प्रसारमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे नागरिकांमध्ये चिंतादेखील आहे, अशा प्रसंगात नागरिकांनी न घाबरता तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करत आज विक्रोळी पोलिसांनी विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर व टागोरनगर परिसरात संचलन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचालन घेण्यात आले.