VIDEO : एका वर्षानंतर विद्यार्थ्यांनीनी कला मंचावर सादर केले सामूहिक कथ्थक नृत्य; पाहा बहारदार कार्यक्रम - Kalananda Dance Institute
नाशिक - कोरोनाचे नियम पळून सांस्कृतिक कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दिवाळीचे औचित्य साधत सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. असाच एक बहारदार कार्यक्रम नाशिक मध्ये संपन्न झाला. कोरोनामुळे मागील एक वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने कथ्थक नृत्याचे धडे घेतलेल्या कलानंद नृत्य संस्थांच्या विद्यार्थ्यांनीनी आपली कला मंचावर सादर केली यावेळी कथ्थक नृत्यातील गणपती वंदना, ताल, झापताल, तरणाम, रंगढंग आदी नृत्य सादर करून विद्यार्थीनींनी उपस्थिती रसिकांची वाह वाह मिळवली.