मुलुंडमधील रहिवासी इमारतीमध्ये लसीकरणाला सुरुवात, खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते झाले उद्घाटन
मुबंई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कोरोना प्रतिबंधक लस आली आहे. पण, लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी रहिवासी इमारतींमध्ये लसीकरण करण्याची खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदाच मुलुंडमधील रहिवासी इमारतीमध्ये लसीकरणाला आजपासून (दि. 23 मे) सुरुवात झाली आहे. मुलुंडमधील गोल्डन बिलोज या रहिवासी इमारतीमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आला आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते करण्यात आले असून लसीकरणास सुरुवात झाली आहे.