अमरावतीच्या बसस्थानकावर विनामास्क प्रवाशांचा वावर - अमरावती कोेरोना न्यूज
अमरावती - जिल्ह्यासह राज्यातील कोरोना बाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत आहे. त्यामुळे लोकांनी प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिग पाळणे, मास्क लावणे अनिवार्य आहे. मात्र, आजही अनेक बेजबाबदार नागरिक विना मास्क फिरत आहे. अमरावती मधील मध्यवर्ती बस स्थानकात तर विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सर्रास वावर दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा विसर झाला की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांना मास्क न लावण्याचे कारण विचारले असता अनेक अफलातून उत्तरे हे बेजबाबदार प्रवाशी देतांना दिसून येत आहे. या स्थितीचा आढावा घेतला आहे, ईटिव्ही भारतच्या प्रतिनिधींनी.