राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू - automatic gates of Radhanagari Dam
कोल्हापूर - कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दोन दरवाजे उघडले होते. मात्र त्यानंतर काही वेळाने पुन्हा दोन दरवाजे उघडण्यात आले. त्या दोन्ही दरवाजे आणि पॉवर हाउसमधून एकूण 4 हजार 256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू झाला. धरणाचे चार दरवाजे उघडले असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा आता किंचित प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्थिती सुधारत असतानाच आता धरणाचे दरवाजे उघडल्याने भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय नदीकाठच्या नागरिकांना सातर्कतेच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.
Last Updated : Jul 25, 2021, 7:23 PM IST