जालना : मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; अंजना नदीला पूर - jalna anjana river news
जालना - मध्यरात्री जालना जिल्ह्यातील हसनाबाद आणि तळेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊसमुळे अंजना नदीपत्राला आलेल्या पूर आला होता. त्यामुळे अंजनी नदीपत्रावर असलेल्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. तर पुलावर पाणी वाहत असल्याने सावखेडा, विटा, खातगाव, पिंप्री, तळेगाव, हसनाबाद या गावांचा संपर्क तुटला आहे. तर रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले पीक आडवे झाले आहे.