VIDEO : अतिवृष्टीने नदीवरील पूल गेला वाहून, मानवी साखळी करून नागरिकांना वाचवतानाचा पाहा थरारक व्हिडिओ - Thrilling video of Rescue opration
पुरात पूल वाहून गेल्यानंतर नागरिकांना मानवी साखळीच्या सहाय्याने वाचवतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागातील आहे. एका लहानग्याला मानवी साखळीने ओढ्यावरुन रेस्कू करतानाचे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरातील वांग नदीवरील पूल वाहून गेल्याने धनावडेवाडी, शिंदेवाडी गावातील लोक पुराच्या पाण्यात अडकली होती. त्यामुळे त्या गावातील 32 कुटुंबातील 100 हून अधिक लोकांना वाचवण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे होतं. त्याहूनही मोठं आव्हान या गावातील लहान बाळाला वाचवण्याचं होत. ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी मानवी साखळी तयार करत या चुमुकल्याचा जीव वाचवला आहे. सध्या हे बाळ आणि सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत.