बेडआभावी आईचा कोरोनामुळे मृत्यू, त्यानंतर मुलाने केले 'हे' कौतुकास्पद काम - सांगलीतील कोविड रुग्णालय
सांगली - आई कोरोनाग्रस्त मुलाकडेही पैशाची कमी नव्हती. मात्र, खासगी रुग्णालयात उपचारासाठी खाट मिळाली नाही. अखेर शासकीय रुग्णालयात त्या मुलाने आईला उपचारासाठी दाखल केले. पण, वेळेवर उपचार न मिळाल्याने आई दगावली. या दुःखाने तो खचून गेला नाही. पैसे असतानाही खाट मिळाली नाही तर गोरगरिबांचे काय हाल असतील या विवंचनेतून त्याने ना नफा ना तोटा या तत्वावर 40 खाटांचे कोविड रुग्णालय उभे केले.