क्रूझ ड्रग्स प्रकरणात नाव आलेल्या सुनील पाटील यांच्या धुळ्यातील घराला कुलूप - सुनील पाटील
धुळे - क्रूझ ड्रग्स प्रकरणातील धुळ्यातील सुनील पाटील उर्फ सुनील चौधरी यांचे नाव आले आहे. धुळे शहरातील जमणगिरी रस्त्यावरील वैभव नगर येथील त्यांच्या निवासस्थानाला कुलूप असून मागील तीन ते चार महिन्यांपासून वीज बिलही थकीत असल्याचे वीज बिलावरुन दिसून येते. मागील 2 ते 3 दिवसांपासून त्यांच्या निवासस्थानास कुलूप असल्याचे दिसत आहे. मात्र, या ठिकाणी सुनील पाटील यांचे आई-वडील वास्तव्यास असतात. सुनील पाटील कधीतरी येथील निवासस्थानी येत-जात असतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यांच्याशी व त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत आहे.
Last Updated : Nov 6, 2021, 9:33 PM IST