मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीच्या खेरवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या - मुंबई क्राइम न्यूजॉ
मुंबई - रस्त्याने चालत जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल हिसकावून पसार होणाऱ्या टोळीला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 6 मोबाईल, 11 महागड्या दुचाकी, 2 रिक्षा, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी साजिद मोहम्मद काय्युम अन्सारी, अब्दुला मोहम्मद सलीम खान, नावेद नदीम शेख, मुद्दसिर फैजल खान उर्फ चिंटू, मोईन मुर्तुजा शेख, मोहम्मद मतीन इस्माईल शेख उर्फ पापा, रिजवान मोहम्मद शफी शेख यांना पोलिसांनी अटक केली असून एका अल्पवयीन संशयीत मुलास ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.