अखेर देवाचे दार उघडले : साईबाबांच्या शिर्डीतील परिस्थितीचा 'ईटीव्ही'ने घेतलेला आढावा...
शिर्डी (अहमदनगर) - अखेर जवळपास आठ महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील प्रार्थनास्थळे आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थनास्थळे मागील आठ महिन्यांपासून बंद होती. कोरोनाची तीव्रती कमी झाल्यानंतर अनलॉकमध्ये राज्य शासनाकडून हळूहळू अनेक व्यवसायाला परवानगी दिली जात आहे. यानंतर आजपासून मंदिरेही सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर साईबाबांच्या शिर्डीतील परिस्थितीचा आढावा घेत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी यांनी साईबाबा मंदिराचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्याशी संवाद साधला. पाहूयात ते काय म्हणाले...