नांदेडात स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी - नांदेड शहर बातमी
नांदेड - स्ट्रॉबेरीची शेती म्हटले महाबळेश्वर जिल्ह्याची आठवण येते. मात्र नांदेडातील एका तरुणाने चक्क आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलवली आहे. अर्जुन जाधव, असे त्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. लोहा तालुक्यातील डेरला येथे हा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे स्ट्रॉबेरी पिकाला मराठवाड्यातील हवामान पोषक नाही, असा शेतकऱ्यांचा समज दूर झाला आहे.