महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

नाशिकमध्ये त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ कडकडीत बंद; मशिदींमध्ये 'अमन'साठी दुआ - नाशिक लेटेस्ट न्यूज

By

Published : Nov 13, 2021, 3:01 AM IST

नाशिक - मुस्लीम समाजाचे धर्मगुरू पैगंबरांविषयी अपमानास्पद घोषणाबाजी व त्रिपुरा हिंसेच्या निषेधार्थ (Tripura violence Protest) शुक्रवारी नाशिक शहरात बंदची (nashik close) हाक देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत नाशकातील मुस्लीमबहूल परिसरात कडकडीत बंद ठेवण्यात आला. मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवावे, त्यांना त्वरित संरक्षण देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरात कुठे ही कोणत्या प्रकारचे निदर्शने न करता जुम्माच्या नमाजानंतर मशिदींमध्ये देशात व त्रिपुरा येथे 'अमन'साठी खास दुआ पठण करण्यात आली. त्रिपुरा येथे पैगंबरांबद्दल अपशब्द वापरुन काही समाजकंटकांकडून तेथील स्थानिक मुस्लीम बांधवांवर अन्याय अत्याचार केले जात आहे. स्थानिक मुस्लीम बांधवांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्रिपुरा येथील हलगर्जीपणामुळे स्थानिक मुस्लीम बांधवांवर अत्याचार झाल्याचा आरोप नाशिक मधील मुस्लिम बांधव करत आहेत. मुस्लिमांवर होणारे अन्याय अत्याचार थांबविण्यात यावे, त्यांना त्वरित संरक्षण देण्यात यावे. हिंसेच्या आड ज्या समाजकंटकांकडून रक्ताची होळी खेळली जात आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करावे. अशा मागण्यासह घटनेच्या निषेधार्थ हे बंद पुकारण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details