'न्यायव्यवस्थेकडून लवकर न्याय मिळत नाही म्हणूनच लोकांमध्ये तीव्र भावना' - हैदराबाद एन्काऊंटर
मुंबई - हैदराबाद लैंगिक अत्याचार आणि हत्याप्रकरणात आरोपींच्या एन्काऊंटरमुळे मुलीला न्याय मिळाला, असे म्हणून अनेकजण आनंद साजरा करीत आहेत. मात्र, हाच आनंद कायद्याच्या माध्यमातून मिळाला असता तर जास्त आनंद झाला असता. मात्र, आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये प्रकरण प्रलंबित राहतात. लवकर न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र होतात, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहटकर म्हणाल्या. त्यांच्याशी अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी...