रुपाली चाकणकरांनी कुटुंबियांसोबत साजरी केली 'भाऊबीज'; ETV भारतचा आढावा - Rupali Chakankar bhaubeej
पुणे - भाऊबीजच्या दिवशी बहीण भावाला औक्षण करत भावाप्रति प्रेम व्यक्त करत असते. याच निमित्ताने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या कुटुंबियांबरोबर भाऊबीज साजरी केली. जितकी प्रयत्नांची पराकाष्टा करता येईल तितकी करेल आणि या महाराष्ट्रातील प्रत्येकाला महिला आयोग हा आपला आयोग वाटेल असं काम मी करेल. तसेच येणाऱ्या काळात राज्यात शक्ती कायदा अंमलात आणण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास यावेळी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे. भाऊबीजच्या निमित्ताने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनेी...