VIDEO : अघोषित आणीबाणी लावण्यापेक्षा राज्य सरकारने आणीबाणी घोषित करावी - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका
हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर किरीट सोमैया आज सायंकाळी कोल्हापूरच्या दिशेने रवाना होणार होते. परंतु त्या आधीच राज्य सरकारकडून किरीट सोमैया यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किरीट सोमैया यांना जिल्हा बंदीची नोटीसही बजावली आहे. राज्य सरकारच्या या कृत्याचा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निषेध केला. चंद्रकांत पाटील म्हणाले राज्य सरकारने किरीट सोमय्या यांना घरात रोखून एक प्रकारे अघोषित आणीबाणी लागू केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला जर किरीट सोमैया यांच्याविषयी कुठलीही भीती वाटत नाही, तर त्यांनी सोमैया यांना अशाप्रकारे रोखणे बरोबर नाही. राज्य सरकारचे हे कृत्य म्हणजे हुकूमशाही आणि दडपशाही आहे. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे हुकूमशाही कधीही सहन करणार नाही. अघोषित आणीबाणी लावण्यापेक्षा राज्य सरकारने सरसर आणीबाणी घोषित करावी.
Last Updated : Sep 19, 2021, 9:18 PM IST