नवरात्री विशेष : 'त्या' दोघींच्या कर्तृत्वामुळेच नागपुरातील वेश्यावस्ती 'कोरोना फ्री' - nagpur prostitute
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात आज कोरोना रुग्णांची संख्या नव्वद हजार झालेली आहे. शहरातील प्रत्येक परिसर आणि प्रभागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र शहरातील एक परिसर असा आहे, ज्याला कोरोनाने संसर्ग केलेला नाही. सात महिन्यांनंतरही या वस्तीत कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही. या परिसरात अनेक एड्सबाधित रुग्ण देखील वास्तव्यास आहेत. ते देखील कोरोना काळात सुरक्षित राहिले. हा परिसर वारांगणांची वस्ती म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालतो. त्याचं नाव आहे गंगा-जमुना!