VIDEO : सोयाबीन शेतकरी संकटात; विविध मागण्यांसाठी वाशिममध्ये भर पावसात काढला मोर्चा - soyabeen farmer morcha washim
वाशिम - सोयाबीनचा हंगाम जवळ आला आणि दहा हजाराचे दर पाच हजारांवर आले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनला सरसकट 10 हजार रुपये दर मिळावे, हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं भर पावसात रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्यात आला. स्थानिक शिवाजी चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जोरदार पावसात ही आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.