मुंबईत लसीचा तुटवडा; 30 हुन अधिक केंद्र बंद
मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीचा साठा नसल्याने काल 30 केंद्र बंद करण्यात आली आहेत. पालिकेकडे दीड दिवस पुरेल इतका साठा असल्याने काही ठिकाणची तर उद्या सर्वच केंद्र बंद होऊन लसीकरण ठप्प होणार आहे. काल जी केंद्र बंद झाली त्याठिकाणी लसी देऊन लसीकरण आज पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मुंबईत पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनसाठी मोठे टॅंक बसवण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यासाठी पालिकेने वॉर रूमच्या माध्यमातून बेड दिले जातील असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन पालिकेच्या रुग्णालयात आहे. मात्र, खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन बाहेरून आणायला सांगितले जात असल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. यावर राज्य सरकारची एफडीए टीम यावर लक्ष ठेवून आहे. याचा आढावा घेतला ईटीव्हीचे प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी...
Last Updated : Apr 9, 2021, 1:02 PM IST