पेट्रोल दरवाढी विरोधात सेनेचे 'गाजर लॉलीपॉप' आंदोलन - शिवसेना आंदोलन लेटेस्ट नयूज
मुंबई- मोदी सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या नव्या करवाढीमुळे पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ होणार आहे. या दरवाढी विरोधात शिवसेनेच्यावतीने आज राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. आज दादर येथे देखील शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना गाजर आणि लॉलीपॉप देऊन या दरवाढीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाबाबत विशाखा राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी. यावेळी एका बाजूला मोदी सरकार 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवत आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र सामान्य जनतेचे जगणे मुश्कील करत असल्याचा आरोप विशाखा राऊत यांनी केला आहे.