महागाईवरून शिवसेनेच्या रणरागिणींनी 'असा' केला पंतप्रधानांचा उपहासात्मक निषेध; पाहा व्हिडिओ - ETV BHARAT MAHARASHTRA
रत्नागिरी - सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेल दर दिवसेंदिवस वाढत आहेत, तर गॅस सिलेंडरच्या दरानेही उच्चाक गाठला आहे. या वाढत्या महागाईविरोधात रत्नागिरीतील शिवसेनेच्या महिला आघाडीने मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले. पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्याची दिलेली आश्वासने हवते विरली आहेत. गॅस, पेट्रोल आणि जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे नकोसे झाले आहे. त्यामुळे आम्ही याचा निषेध करत असल्याच्या भावना यावेळी महिला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या. यावेळी मोदींच्या फोटोसमोर आरती करत महागाईमुळे त्रस्त गृहिणीच्या भावना पथनाट्याच्या माध्यमातून दाखवल्या गेल्या. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
Last Updated : Oct 16, 2021, 10:57 PM IST