'शाहू, फुले आंबेडकरांनी दिलेल्या दिशेवर आधारित मानसिकता तयार करण्याची खबरदारी घ्यावी लागेल'
मुंबई - जी वीचार धारा घेऊन आपन पुढची पावल टाकायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण सगळ्यानी सामुहीक कष्ट केले त्या सर्व कष्टाचा सन्मान करण्याची भूमीका आज आपन करत आहात. जी वीचार धार आपन स्वीकारली त्या रस्त्याने जान्याचा आखंड प्रयत्न करायचा असतो, तो करणं हाच खऱ्या अर्थानं अन्य पिढीच्या लोकाना प्रोचाहन देत असतो. अनेकानी शाहु, फुले, आबेडकरांचा उल्लेख केला त्यांनी आपल्याला काही दिशा दिली. आज त्यांच्या नावाचा उल्लेख करून चालनार नाही, तर त्यांनी जी दृष्टी आपल्याला दिली त्यावर आधारित एक प्रकारची मानसिकता तयार करण्याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. असे वाढदिवसाबद्दल आयोजीत कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले.