ब्रह्मनाळ दूर्घटना : सरकारी अनास्थेचे बळी - sangali floods
काळीज हेलावणारी ही दृश्य कोणत्या चित्रपटातील नाहीत. ही तुमच्या माझ्या पुरोगामी प्रगतशील महाराष्ट्रातीलच आहेत. हे बळी फक्त निसर्ग आपत्तीचे नाहीत तर सरकारी अनास्था आणि निद्रिस्त व्यवस्था यांचे आहेत. चार वर्षा पूर्वी सीरियाच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळलेला अॅलन कुर्दी, मेक्सिकोच्या नदी काठी बापाच्या पाठीवर मृत्यू घेऊन निजलेली मुलगी आणि आज या आजीच्या कुशीत मृत्युला कवेत घेऊन निजलेला हा निश्पाप जीव, या तीनही घटनांना जोडणारा एक सामान धागा आहे तो म्हणजे निद्रित राज्य व्यवस्था.