VIDEO : घोटाळ्यांमुळेच एसटी डबघाईला, कर्मचाऱ्यांची काय चूक? - सदाभाऊ खोत
मुंबई - एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा ही प्रमुख मागणी घेऊन सरकार विरुद्ध आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST workers strike) सुरू आहे. गोपीचंद पडळकर(MLA Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत(MLA Sadabhau Khot) यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. बुधवारी परिवहन मंत्री अनिल परब(Minister Anil Parab) यांनी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर चर्चा करून, त्यांना एसटी महामंडळाची परिस्थिती समजावून सांगितली आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, आंदोलन मागे न घेता एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होत नाही, तेंव्हापर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. सदाभाऊ खोत यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली आहे.