'मुख्यमंत्रीपदी असताना विसर पडलेल्या गुणांची फडणवीसांना आता आठवण' - सचिन सावंत देवेंद्र फडणवीस टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी असताना गुणांचा विसर पडला होता. मात्र, आता विरोधी पक्षनेते असताना त्यांना या गुणांची आठवण झाली आहे, अशी टीका कांग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना आंदोलकांना देशद्रोही म्हटले होते. तसेच विरोधकांना दलालही संबोधले होते. तेच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे, असेही सावंत म्हणाले.