Video : 'विरोधात कोण आणि किती हा विषय गौण होता, आबांच्या संघर्षाचा वारसा सोबत आहे' - रोहित पाटील विजयी
सांगली - निवडणुकीत समोर विरोधात कोण आणि विरोधक किती, हा माझ्या दृष्टीने गौण विषय होता. आबांच्या संघर्षाचा वारसा आपल्याकडे आहे आणि संघर्षावर मात करण्याची आपली तयारी आहे, अशा शब्दात माजी गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या विजयानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे चांगलीच प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.