खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका
कोल्हापूर - एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे संपामुळे एसटी सेवा ठप्प झाली आहे आणि त्याचा फायदा खाजगी वाहतूकदार घेताना दिसत आहे. 500 रुपयांचे तिकीट तब्बल 1500 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत असून तशा तक्रारी प्रवाशी करत आहे. अनेक प्रवाशी सकाळपासून याठिकाणी अडकले असून आता घरी जायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. एकंदर संपादरम्यान बसस्थानकावर प्रवाश्यांना मनस्ताप करण्याची वेळ आली आहे. याबाबत बसस्थानकातून आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...