पुण्यात स्वातंत्र्यदिनी 75 मीटर लांबीचा ध्वज ठेवून रॅली - flag on Independence Day
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिवशी 75 मीटर लांबीचा ध्वज ठेवून रॅली काढण्यात आली. रॅलीत विविध महापुरुषांचे वेशभूषा केलेले अनेक बालक सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते आबा बागुल आणि अमित बागुल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व महापुरुषांची आठवण आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाची सर्वांना जाणीव व्हावी आणि भारतात एकात्मता आणि शांतता नांदावी हे या रॅलीचे मुख्य प्रयोजन होते. या रॅलीमध्ये अनेक बालक, तरुण वर्ग आणि अनेक नागरिकांनी सहभाग घेतला होता.