नंदुरबार जिल्ह्यात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद; सर्व बसफेऱ्या रद्द, रेल्वे स्थानकावर शुकशुकाट - नंदुरबार जिल्ह्यात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद
नंदुरबार - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. नंदुरबार शहरातील सर्वच व्यवहार आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. तर जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या सर्व फेऱ्या रद्द केल्याने बस स्थानकावरही शुकशुकाट पाहायला मिळाला. जिल्ह्यातील सर्व प्रकारची कार्यालये व बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.