मानसिक आरोग्याच्या समस्येत वाढ; मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात... - मानसिक आरोग्या रुग्ण बातमी
कोल्हापूर - नुकताच जगातील मानसिक आरोग्य दिन पार पडला. मात्र, दुसरीकडे धक्कादायक बाब म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. लॉकडाऊन काळात तर ही संख्या दुप्पट झाली असल्याचे समोर आले आहे. कोल्हापुरातसुद्धा अशाच पद्धतीचे चित्र असून या समस्येबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी कोल्हापुरातील मानसोपचार तज्ज्ञ शाल्मली रानमळे यांच्याशी खास बातचीत केलीये 'ई टीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी...