विशेष मुलाखत! '105 देशात संसदेचे काम सुरू, आपल्या इथे मोदींनी संसदेला कुलूप ठोकलंय'
मुंबई - कोरोनाच्या अगोदर आणि नंतरही आर्थिक मंदीचे वातावरण होते. त्यात आता कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशावेळी सरकारी खजिन्यातून केंद्राने लोकांना थेट अंशतः पगार दिले पाहिजेत. त्यामुळे कोरोनात रोजगार गेले आहेत, त्यांची उपासमार थांबेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्थेची परिस्थिती खुप गंभीर आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खूप महत्वाची पाऊले उचलायला पाहिजे. पण सरकार ते करत नाही. इतर देशात नागरिकांना थेट मदत दिली जात आहे. तसेच इतर देशात संसदेचे काम चालू आहे. साधारण 105 देशातील संसदेचे कामकाज चालू असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसे आपल्या देशात होत नाही. संसद चालू असल्यास आर्थिक विषयावर निर्णय घेता येतील. अमेरिकेत संसदेत गेल्या महिन्याभरात आर्थिक विषयावर पाच निर्णय/कायदे त्यांच्या संसदेत पास केले. आपल्या देशात मात्र, गेले चार महिने मोदींनी संसदेला कुलूप ठोकलंय, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
Last Updated : Jul 25, 2020, 5:50 AM IST