पुणे: फुल बाजारात झेंडूच्या फुलांना मातीमोल भाव; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - झेंडू उत्पादक शेतकरी नुकसान
पुणे- मागील वर्षी गणेशोत्सव काळात झेंडूच्या फुलांना प्रति किलो 200 रुपये ते 300 रुपये असा उच्चांकी भाव मिळाला होता. मात्र, या वर्षी हे चित्र पालटले आहे. फुलांची झालेली आवक आणि मागणी त्यात सततचा पाऊस आणि कोरोना निर्बंध यामुळे फुलांच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.