ठाकरे सरकारला कणा नाही; हे एक गुन्हेगारी सरकार- प्रकाश आंबेडकर - uddhav thackeray latest news
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वंचित आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीदरम्यान आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर खरपूस टीका केली आहे. उद्धव ठाकरे सरकारला कणा नसून हे एक गुन्हेगारी सरकार आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करून नवीन सरकार सत्तेवर यावे असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्यातल्या कोरोना परिस्थितीची आढावाही आंबेडकर यांनी घेतला. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या संख्येवर आळा घालण्यासााठी राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. मात्र, कोरोन रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नसल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Last Updated : Mar 28, 2021, 3:03 PM IST