विरोध असतानाही केंद्र सरकार शेतकऱ्यांवर कायदे का लादत आहे, प्रफुल्ल पटेलांचा सवाल - गोंदिया जिल्हा बातमी
गोंदिया - केंद्र सरकारने कायदे पारित करताना शेतकऱ्यांचे, शेतकरी संघटनेचे व विविध पक्षाचे मत विचारात घेतले नाही. संसदेमध्येही या कायद्याबाबत मतभेद असल्याने विरोधी पक्षांनी मतदानाची मागणी केली होती. मात्र, मतदान न घेता गोंधळात आवाजी मताने ते पारित करण्यात आले. हा कायदा देशातील शेतकरी नाकारत आहेत. मग सरकार हे कायदे शेतकऱ्यांवर का लादत आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला. भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चा करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.