"अर्थसंकल्पातील कृषी योजना चांगल्या मात्र अंमलबजावणीसह बाजारपेठ हा प्रश्न अनुत्तरितच"
अर्थसंकल्पात नमुद केलेल्या कृषी विषयक धोरणाबाबत बोलताना आदर्शग्राम हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी सरकारने नियोजित कृषी विषयक सरकारच्या धोरणांचे स्वागत करताना या योजनांची आणि शेती मालाला शाश्वत बाजारपेठ याबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून, कृषी क्षेत्राशी निगडित विविध बाबींवर अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात ज्या योजना घोषित केल्या त्यावर पोपटराव पवार यांनी आपली मत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडले.