Video : भर रस्त्यात कपडे काढून तृतीयपंथीयांची पोलिसांना मारहाण - तृतीयपंथीयांची पोलिसांना मारहाण
मुंबईतील बांगुर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील भर रस्त्यात तृतीयांपंथीयांनी कपडे काढून पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालक व बाईक अपघात झाला. त्यानंतर रिक्षा चालकाच्या समर्थनात तृतीयांपंथी त्याठिकणी आले. बाईकचालकाला मारहाण करण्यासाठी ते गेले. मात्र मधात आलेल्या पोलिसांनाच त्यांनी मारहाण केली. याप्रकरणी तीन तृतीयपंथीयांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिघांवर 353, 332, 188, 51 एनडीएमए कायदा आणि आयपीसीच्या 34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.