नवीन शैक्षणिक वर्ष : काय म्हणाले पालक? - indias new education year
मुंबई - यंदाचे शैक्षणिक वर्ष हे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 असे जाहीर करून 1 जानेवारी 2021 ला शाळा सुरू कराव्या, अशी मागणी भाजपने केली आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेत बसून विद्यार्थी नीट अभ्यास करत नाहीत, तर 'ऑनलाइन अभ्यासाचे तर तीन तेरा' झाले आहेत, असे पालक सांगत आहेत. त्यामुळे एकंदरीत या सर्व परिस्थितीवर पालकांना व मुलांना काय वाटते, याबाबत 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्यासोबत संवाद साधला. पाहूयात ते काय म्हणाले,