Video : सावळ्या विठुरायाच्या चरणी दुर्वांची आकर्षक आरास; मंदिरात साकारले अष्टविनायकांचे रुप - पंढरपूर मंदिर
पंढरपूर - श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज परिवर्तिनी एकादशी निमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात खास दूर्वांची आरास करण्यात आली होती. त्यात गुलाब, झेंडू, शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक सजावट केली. यामध्ये अष्टविनायक प्रतिमा बसवल्याने विठ्ठल गाभाऱ्यात अष्टविनायक अवतरल्याचा सुंदर आभास तयार झाला आहे. ही सजावट नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांनी केली होती. विठ्ठल गाभारा, चौखांबी, सोळखांबी व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दुर्वांची आकर्षक पद्धतीने आरास केली आहे. विठुरायाच्या गाभार्यासह मंदिरात मोरया नावाची आरास करण्यात आली. गुलाब, झेंडू, शेवंती, तगर, अष्टर विविध 700 टन फुलांची समावेश करण्यात आला. पंढरपूरच्या विठ्ठ्ल मंदिरात महत्त्वाच्या सणांना फूलांची सजावट करण्याची पद्धत आहे. सध्या मंदिरांत दर्शनासाठी भाविक येत नसले तरी मंदिर समितीकडून ही प्रथा कायम ठेवण्यात आली आहे.