प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पार पडली 'संत्रा परिषद' - वंचितची अमरावतीत संत्रा परिषद
अमरावती - संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दैवी व्यथा लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (रविवारी) अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत संत्रा परिषद घेण्यात आली होती. विदर्भात संत्रावर प्रक्रिया उद्योग नसल्याने संत्राला बाजारभाव मिळत नाही आहे. त्यामुळे तरुण शेतकरी सम्यक हगवणे यांनी अंगावर पोस्टर लावत शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी विनंती केली. तर यावेळी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.