महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"आजोबांची 'अशी' भूमिका पार्थ पवारांचे मनोबल खच्ची करणारी आहे"

By

Published : Aug 12, 2020, 8:19 PM IST

मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेल्या विधानाला कवडीचीही किंमत नाही. त्यांच्या विधानाचा आणि पक्षाचा तसा कोणताही संबंध नाही, असे शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत बोलताना म्हटले. यावर विरोधकांकडून आता प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर बोलताना, पार्थ पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका अपरिपक्व नेत्याला उमेदवारी दिली का? असा प्रश्न निर्माण करत. पार्थ पवार युवा नेते आहेत. त्यांच्या भूमिकेत काही खाली-वर असू शकते. पण त्यांना काडीचीही किंमत नाही, असे म्हटल्याने या युवा नेतृत्वाचे मनोबल खच्ची होईल' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details