हा अर्थसंकल्प म्हणजे गेल्या अधिवेशनातील घोषणांचा पुनर्रच्चार- प्रविण दरेकर
मुंबई - हा अर्थसंकल्प म्हणजे मागच्यांचा घोषणांचा पुनर्रच्चार कऱण्याचे काम आहे. सुकाळ आणि अमंलबजावणी तरतुदीचा दुष्काळ आहे. या अर्थसंकल्पात कोणताही ठाम निर्णय नाही, मानस आहे, निर्णय घ्यायाच विचार आहे, करू देऊ, घेऊ अशा आश्वासनाचा हा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसली.. इंधन दर कमी कऱण्याबाबत तरतूद नाही. विदर्भ मराठवाड्यासाठी काही नाही. मागील अधिवेशनातील घोषणांची पुन्हा घोषणा केली आहे. पुणे रिंग रोड, सोलापूर विमानतळ या त्याच घोषणा आहेत. राष्ट्रवादीच्या वजनदार मंत्र्यांच्या मतदार संघासाठी हा अर्थसंकल्प होता अशी टीकाही दरेकर यांनी केली.