VIDEO: वाझेंना घेऊन एनआयएकडून मिठी नदीत तपास; सीपीयू, लॅपटॉपसह साहित्य जप्त - मिठी नदीत तपास
मुंबई - राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर तपासणी केली आहे. यावेळी सचिन वाझे यांनी दाखवलेल्या मिठी नदी जवळील जागेवर मिठी नदीत फेकून दिलेल्या काही वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न एनआयए कडून करण्यात आला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझे यांनी मिठी नदीत फेकून दिलेल्या वस्तूंमध्ये एक डीव्हीआर, काही नंबर प्लेट तर एक सीपीयू होता, या सर्व वस्तू एनआयएकडून जप्त करण्यात आल्या आहेत. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल सवने यांनी..